जळगाव (प्रतिनिधी) ईद-ए-मिलाद अर्थातच हजरत मोहम्मद पैगंबर (स) यांच्या जयंती निमित्ताने मुस्लिम मानियार बिरादरी च्यावतीने मराठी भाषिक व हिंदू बांधवांसाठी ‘चला समजून घेऊया’ या मथळ्याखाली पारनेरचे प्रसिद्ध विचारवंत डॉ. रफिक पारनेरकर तसेच अहमदनगर येथील प्रसिद्ध व्याख्याते डॉ. ईक्राम खान यांचे मराठी भाषेत व्याख्यानाचे आयोजन जळगाव जिल्हा पत्रकार भवन येथे दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत केले आहे.
मोहम्मद पैगंबर (स) यांचे पवित्र जीवन तसेच धर्मपरिवर्तन, लव जिहाद, आतंकवाद संबंधी इस्लाम व अंतिम प्रेषितांचे संदेश या दोन विषयावर व्याख्यान होणार आहे. उपस्थितांनी इस्लाम व प्रेषितांच्याबाबत आपल्या मनातील गैरसमज प्रश्न रुपी मांडल्यास त्याचे समाधानकारक उत्तरे विचारवंत देतील. तर चला व सुसंवादाद्वारे समजून घेऊ या एकमेकास व अंतिम प्रेषितांच्या जीवन चरित्र्यास म्हणून न चुकता या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.