जळगाव (प्रतिनिधी) जैन हिल्स येथे 1 व 2 जून आणि 4, 5 जून ला फाली ( Future Agriculture leaders of india) या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि गुजरात मधील 135 शाळेतून 800 विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
लहान मुलांमधून कृषी उद्योजक तयार व्हावेत, शेतकऱ्यांची नवीन पिढी निर्माण व्हावी हा यामागील उद्देश आहे. 2 जून ला या सहभागी विद्यार्थ्यानी साकारलेल्या शेती विषयक नाविन्यपूर्ण संशोधन व संकल्पनेचे एकूण 67 स्टॉलचे प्रदर्शन आयोजित केले आहे. सकाळी 11.30 ला हे आगळे-वेगळे प्रदर्शन पाहण्यासाठी आपण निमंत्रित आहात, तर या संमेलनाचा समारोप दुपारी 4 ला असेल. या कार्यक्रमास जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि यूपीएलचे अध्यक्ष राजू श्राॕफ हे प्रमुख पाहुणे संबोधन करतील. 5 जून रोजी ही सकाळी 11,30 ला प्रदर्शन असेल आणि समारोपाच्या कार्यक्रमास गोदरेज ऍग्रीवेट चे बुरजींन गोदरेज आणि जैन इरिगेशन चे उपाध्यक्ष अनिल जैन हे संबोधन करतील.