धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव येथे शिवसेनेचा वर्धापन दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना १९ जुन १९६६ रोजी थोर साहित्यक व पुरोगामी विचार सरनीचे, हिदूऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे याचे वडील प्रबोधनकार ठाकरे व निर्भीड प्रतिकार तसेच महाराष्ट्र एकीकरण आंदोलनाचे तेतृत्व करणारे प्र. के. अत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत, शिवाजी पार्क येथे शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्या शिवसेनेचा उद्या ५५ वा वर्धापन दिवस आहे, त्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक व रोग निदान शिबीर, वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
धरणगाव शहरामधे स्लम भागात अन्नदान व शहरातील विविध मैदानावर मोकळ्या जागेत वृक्ष लागवड व त्याचे संगोपन असे सामाजिक उपक्रम शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन विविध शिवसेना शाखेने केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना सहसंपर्कप्रमुख, गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते विनय भावे उपस्थित राहणार आहेत,
तरी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला शहरातील शाखाप्रमुख, पदाधिकारी, नगरसेवक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांनी केले आहे.