चोपडा (प्रतिनिधी) ओळखीचा फायदा घेवून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार करून दिला गर्भवती केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिडीतेने धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर तो अडावद पोलिसात वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
या संदर्भात पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पिडीता व तिची आई ऊस तोड कामासाठी चोपडा तालुक्यातील एका गावात गेले होते. तेथे १ फेब्रुवारी ते ४ एप्रिलच्या दरम्यान, सागर संजय मोरे (वय २३,रा. मोढारे, प्रिंप्री प्र.ऊ. ता. पारोळा) याने ओळखीचा फायदा घेत पिडीतेच्या राहण्याच्या झोपडीत वेळोवेळी तिच्या सोबत शारिरीक संबंध करुन गरोदर केले. तसेच सदर घटनेबाबत कोणसही सांगीतले तर मरुन जाईल, अशी धमकी दिली. या प्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा झिरोनंबरने अडावद पोलिसात वर्ग करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास सपोनि गणेश बुवा हे करीत आहेत.