धरणगाव (प्रतिनिधी) शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार धरणगाव येथील शतकोत्तरी पी.आर.हायस्कूल मध्ये इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत.
पी.आर.हायस्कूलमध्ये इयत्ता नववी दहावीची एकूण वर्गसंख्या ५५३ इतकी असून आज तिसर्या दिवशी दहावीचे ७० विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण शाळा नगरपालिकेच्या वतीने सॅनिटायझराईज फवारणी करुन निर्जतुकीकरण करण्यात आले आहे. एका बाकावर एक विद्यार्थी अशी विद्यार्थी बैठक व्यवस्था करण्यात आली असून एक दिवस दहावी तर दुसर्या दिवशी नववी अशी व्यवस्था आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंन्सन ही त्रिसूत्री अंमलात आणली जात आहे. गेल्या आठ महिन्यांपासून शाळेच्या ओसाड भिंती आता बोलू लागल्या आहेत. घरी राहून आॅनलाईन अभ्यासाला कंटाळलेली मुलं आता शाळेत आनंदाने येत आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र प्राप्त झाली आहेत, त्यांनाच शाळेत येऊ दिले जात आहे. बाकी विद्यार्थी घरी राहून आॅनलाईन अभ्यास करत आहेत.