पाचोरा (प्रतिनिधी) ओटीपी विचारून एका ३३ वर्षीय व्यक्तीची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. एका अनोळखी महिलेने २५ हजाराचा गंडा घातला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात निलेश कवडू क्षीरसागर (वय ३३, संघवी कॉलनी पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी अनोळखी महिलेने निलेश यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन क्रेडीट कार्ड डोमेस्टीक व इंटरनॅशनल यापैकी कन्व्हर्ट करणे कामी तुमचे मोबाईलवर पाठवलेला ओटीपी सांगा असे सांगून निलेश यांच्या खात्यातून २५ हजार रुपये खर्च करुन फसवणुक केली. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोहेकॉ भगवान बडगुजर हे करीत आहेत.