पहूर (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील तोंडापूर गावातील मेडिकल अन्ड जनरल स्टोअर्स व लोकसेवा फार्मा सिल्लोड अशा दोन ठिकाणी फार्मासिस्ट म्हणुन एका रजिस्ट्रेशनवर नियमबाह्य काम केले. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात संदीप सुपडू अंभोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात डॉ. अनिलराव माधवराव माणिकराव (वय ४८, रा. प्लॉट नं १०६, साईलक्ष अपार्टमेंट कोल्हे हिल, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २० ऑगस्ट २०२० ते १० फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये संदीप सुपडू अंभोरे (रा. पिंपळगांव चौखांबे ता. जामनेर) याने तोंडापुर गावी अजिंठा मेडीकल अन्ड जनरल स्टोअर्स व लोकसेवा फार्मा सिल्लोड अशा दोन ठिकाणी फार्मासिस्ट म्हणुन एका रजिस्ट्रेशनवर नियमबाह्य काम केले. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात संदीप सुपडू अंभोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहेत.