जामनेर (प्रतिनिधी) पहूर-जामनेर रस्त्यावरील नागदेवता मंदीरजवळ भीषण अपघात झाला आहे. अज्ञात आयशरने कारला कट मारल्याने मारल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. कार नाल्यात कोसळून त्यातील कार चालकासह एक महिला जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर आहेत. सुदैवाने अपघातात १ वर्षाचे बाळ वाचले आहे.
भुसावळ येथून औरंगाबाद येथे लग्नाच्या कार्यासाठी जात असलेले कार (एमएच १८ डब्लयू २४१२) ने यात कार पकंज गोविंदा सैंदाणे (वय-२५, रा. तुकाराम नगर, भुसावळ) हे चालवत होते. कारमध्ये सुजाता प्रविण हिवरे (वय-३०, रा. त्रिमुर्ती नगर, भुसावळ), हर्षा पंकज सैंदाणे, नेहा राजेश अग्रवाल, प्रतिभा जगदीश सैंदाणे आणि लहान बाळ स्पंदन पंकज सैंदाणे (वय-१) बसलेले होते. पहूर जामनेर रस्त्यावर असलेल्या नागदेवता मंदीराजवळून जात असतांना औरंगाबाद कडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारल्याने कार चालक पंकज सैंदाणे याचा कारवरील ताबा सुटल्याने कार बाजूच्या नाल्यात कोसळली. यात कार चालक पंकज सैंदाणे आणि सुजाता हिवरे यांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले हर्षा पंकज सैंदाणे, नेहा राजेश अग्रवाल, प्रतिभा जगदीश सैंदाणे हे तिघे गंभीररित्या जखमी झाले. सुदैवाने १ वर्षाचे बाळ वाचले आहे.
अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरीकांनी धाव घेवून प्रथम जखमींना तातडीने जामनेर येथील जी.एम. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. यावेळी जामनेरच्या नगराध्यक्ष साधना महाजन यांनी हॉस्पिटलमध्ये धावू घेवून विचारपूस करून मदत कार्य सुरू केले आहे.