जळगाव (प्रतिनिधी) नेहरू युवा केंद्राच्यावतीने आशा फाउंडेशन या संस्थेकडे सोपविण्यात आलेले कार्य म्हणजे एच आय व्ही एड्स या विषयावर विविध ठिकाणी युवकांमध्ये एच आय व्ही विषाणू पसरण्याचे थांबवण्यासाठी आणि याची जनजागृती व्हावी म्हणून या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. आणि नेहरू युवा केंद्राचे जिल्हा अधिकारी व अजिंक्य गवळी यांच्या हस्ते चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
जिल्ह्यात नेहरू युवा केंद्र यांच्यावतीने अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत. तसेच नेहरू युवा केंद्राच्या वतीने आशा फाउंडेशन या संस्थेकडे सोपविण्यात आलेले कार्य म्हणजे एच आय व्ही एड्स या विषयावर चित्रकला स्पर्धा आशा फाउंडेशन यानी जिल्हातील पातोंडा ता. चाळीसगाव, धानोरा ता. चोपडा, गांधली ता. अमळनेर आणि भडगाव या ठिकाणी युवकांमध्ये एच आय व्ही विषाणू पसरण्याचे थांबवण्यासाठी आणि याची जनजागृती व्हावी म्हणून या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तसेच नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र यांनी कार्यक्रमांना शुभेछा दिल्या आहेत. अजिंक्य गवळी यांनी देखील कार्यक्रमात आपले मत ऑनलाइन मांडून युवकांना मार्गदर्शन केले आहे. आशा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत सुभाष बाविस्कर आणि दीपक पाटील यांनी गाव पातळी वर या चित्रकला स्पर्धेची तयारी केली. व आशा फाउंडेशनचे सदस्य वैभव पवनकर बाबलू, श्रीगणेश प्रविण बावीस्कर, महेंद्र गव्हाळे, जितेंद्र रायसिंग, मुकुदा माळी, प्रतिभा सापकले, उमेश पचार, संदीप वाघ यांनी ही स्पर्धा संपन्न केली. आधार संस्थेचे सर्व लिंक वर्कर यांनी या नेहरू युवा केंद्र जळगावच्या या स्पर्धेच्या उपक्रमाला मदत केली आहे.