पारोळा (प्रतिनिधी) सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींना जोपर्यंत पोलीस प्रशासन अटक करत नाही. तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका मयत पीडित मुलीच्या परिवाराने घेतल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
परंतु पोलिसांनी दोन आरोपींना आधीच ताब्यात घेतले आहे आणि इतर आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना केल्याचे सांगितल्यानंतर तणाव निवळला.
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा :- https://wp.me/p5C70v-1Gf
दरम्यान गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरूच असून विभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे शवविच्छेदनाच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत दुसरीकडे अंतिम संस्काराचा करण्याच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बंदोबस्त लावण्यास सुरुवात केली आहे तसेच पीडित कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देणार आहे