धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पष्टाने खु.गावातील जि.प.केंद्र शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ग्रामसंमेलनात विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
सर्वप्रथम माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच शिवाजी देवचंद भिल, माजी सैनिक रविंद्र संभू पाटील, व्याख्याते लक्ष्मणराव पाटील, पष्टाने खु. चे उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, NSS कार्यक्रम अधिकारी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून मंगलमय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात झाली. तद्नंतर प्रतापराव पाटील यांचा पष्टाने खु.चे माजी सरपंच मुरलीधर पाटील यांच्याहस्ते शाल – श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामसंमेलन २०२३ चे औपचारिक उदघाटन झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात दैवत छत्रपती या गीतावर नृत्य सादर करून करण्यात आली. जि.प.केंद्र शाळा आणि माध्यमिक विद्यालय पष्टाने येथील चिमुकल्यांनी आपापले सांस्कृतिक कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगाव यांचे रा.से.योजना एककच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरातील विद्यार्थी – विद्यार्थिनींनी गीतगायन, नृत्य, मिमिक्री, पथनाट्य या माध्यमातून त्यांचे कलागुण सादर करत सामाजिक प्रबोधन केले. बाहुबली ऑर्केस्ट्रा धरणगाव च्या सर्व कलाकारांनी मराठी, हिंदी, देशभक्तीपर गीतांनी व सुरेल संगीताने मैफिल ला चार चांद लावले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.पं.सदस्य दिलीप युवराज पाटील, संजय विश्वास पाटील, मुरलीधर आत्माराम पाटील, निवृत्ती पाटील, मनोज सोनवणे, ग्रामसेवक चतुर पाटील, NSS का.अधिकारी प्रा.डॉ.अभिजित जोशी, प्रा.डॉ.गौरव महाजन, प्रा.डॉ.ज्योती महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी रा.से.यो. युनिट कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगाव, बाहुबली ऑर्केस्ट्रा धरणगाव, ओमसाई टेंट हाऊस, जि.प.केंद्र शाळा, माध्यमिक विद्यालय तसेच सरपंच उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य व सर्व ग्रामस्थ, माजी विद्यार्थी ग्रुप, युवक मित्र परिवार पष्टाने यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी सरपंच किशोर निकम, अभय पाटील आणि त्यांच्या मित्र परिवाराने परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गावातील व परिसरातील पुरुष, महिला, युवक, विद्यार्थी – विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माध्यमिक विद्यालयाचे डी.ए.पाटील सर यांनी केले.