धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पथराड खुर्द ग्रामपंचायत सरपंचपदी मंजुळाबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच उपसरपंचपदी गजानन पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते मंजुळाबाई श्रीकांत चव्हाण आणि गजानन बन्सीलाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावाच्या विकासासाठी नूतन पदाधिकाऱ्यांना सर्वोतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
धरणगाव तालुक्यातील पथराड खुर्द ग्रामपंचायत येथील सरपंच मनोज पाटील यांनी आज (दि. 31) रोजी सरपंच पदाचा राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या पदावर ना. गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले श्रीकांत चव्हाण यांच्या पत्नी मंजुळाबाई चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपसरपंचपदी गजानन पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख भैय्या मराठे, निवडणूक निर्णय अधिकारी महाजन, ग्रामसेवक शिवसुंदर पाटील, ॲड. शरद पाटील, प्रवीण पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण निकुंभ, मनोज निकुंभ, भुषण पाटील, हेमंत निकुंभ, दयाराम चव्हाण, सतीश बोरसे, दीपक तोंडे, बळीराम पाटील, भास्कर पाटील, संजय चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, संतोष चव्हाण,माणिक चव्हाण,चंद्रकांत पाटील, हेमंत पाटील,अर्जुन तोंडे,नवल पाटील,ॲड.कुणाल पाचपोळ,आनंदा चव्हाण,संतोष चव्हाण, पप्पू पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावाच्या विकासासाठी नूतन पदाधिकाऱ्यांना सर्वोतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.