पिंप्री खुर्द ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथे आज सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पोळा तसेच गणपती या सणांच्या अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.
बैठकीत येणाऱ्या सणाविषयी माहिती देताना शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात यावे तसेच कोणत्याही प्रकारचे डीजे अथवा बँड लावण्यास सक्त मनाई आहे. गावात कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाहीत याची सर्व गणेश मंडळांनी व ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक शेळके यांनी केले.
कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच मंगल आण्णा पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर बडगुजर, शांताराम मोरे, प्रकाश लोखंडे, तंटामुक्ती अध्यक्ष ईश्वर धोबी, शिवा महाजन बालू शर्मा, पोलीस पाटील, गोपाल बडगुजर, पत्रकार संतोष पांडे, नितीन मालू, बाळू चौधरी, सुभाष चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.