TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणची अभूतपूर्व कामगिरी !

नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलण्याची मोहीम ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाची चोख अंमलबजावणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 18, 2022
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वितरण रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते तात्काळ बदलण्याची मोहीम सध्या महावितरणकडून सुरू आहे. गेल्या १७ दिवसांमध्ये नादुरुस्त झालेल्या ७१३८ पैकी ६५१६ रोहित्र केवळ ४८ ते ७२ तासांच्या कालावधीत बदलण्यात आले आहेत. तर गेल्या दोन दिवसांमध्ये नादुरुस्त झालेली केवळ ६२२ नादुरुस्त रोहित्रे बदलणे शिल्लक असून तीदेखील तात्काळ बदलण्यात येत आहेत. तर महावितरणकडे सद्यस्थितीत तब्बल ४ हजार १८ रोहित्रे बदलण्यासाठी अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी थकीत व चालू वीजबिलांपोटी खंडित करू नये तसेच नादुरुस्त झालेले वितरण रोहित्र सुरळीत वीजपुरवठ्यासाठी तात्काळ बदलून द्यावे, असे आदेश दिले आहेत. त्याची चोख अंमलबजावणी महावितरणकडून सुरू आहे. यामध्ये राज्यभरात २९ नोव्हेंबरपूर्वी नादुरुस्त असलेली ६ हजार ९२ व त्यानंतर शनिवारपर्यंत (१७ डिसेंबर) नादुरुस्त झालेली ६ हजार ५१६ अशी एकूण १२ हजार ६०८ नादुरुस्त रोहित्रे महावितरणकडून युद्धपातळीवर बदलण्यात आली आहेत.

READ ALSO

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

कृषिपंपांना तीन फेजचा वीजपुरवठा करणारे महावितरणची राज्यभरात एकूण ७ लाख ५४ हजार वितरण रोहित्रे आहेत. यापूर्वी विविध कारणांमुळे सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० रोहित्रे दररोज बदलणे शिल्लक राहत असल्याची परिस्थिती होती. तथापि, यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठ्याचे पाठबळ देण्यासाठी जळालेले किंवा नादुरुस्त झालेले रोहित्र तात्काळ बदलून देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याप्रमाणे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कृती आराखड्याद्वारे सूक्ष्म नियोजन करून व बैठकीद्वारे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना नादुरुस्त रोहित्र तात्काळ बदलण्याची सक्त सूचना केली. सोबतच महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी राज्यात दौरे करून सर्व परिमंडलांचा आढावा घेत नादुरुस्त रोहित्र बदलण्याची कार्यवाही वेगवान केली. परिणामी शनिवार (दि. १७)पर्यंत राज्यभरात मागील दोन दिवसांमध्ये बदलणे शिल्लक राहिलेल्या नादुरुस्त रोहित्रांची संख्या केवळ ६२२ असून ते देखील तात्काळ बदलण्याची कार्यवाही सुरू आहे.

नादुरुस्त किंवा जळालेल्या वितरण रोहित्रांची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणने राज्यभरात १९३४ कंत्राटदार एजन्सीजची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे सद्यस्थितीत ११ हजार ६३२ रोहित्रे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे रोहित्रांच्या दुरुस्तीचा वेगदेखील प्रचंड वाढला आहे. नादुरुस्त झालेले रोहित्र बदलण्यासाठी महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे ऑईलसह तब्बल ४ हजार १८ रोहित्रे सद्यस्थितीत अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी रोहित्र नादुरुस्त झाले असेल त्यासंबंधीची माहिती शेतकरी बांधवांनी संबंधित कार्यालयात किंवा चोवीस तास सुरू असलेल्या १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
गुन्हे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

June 19, 2025
गुन्हे

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

June 19, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025
गुन्हे

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

June 18, 2025
गुन्हे

घरगुतीमधून कमर्शियल सिलींडरमध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर छापा

June 18, 2025
Next Post

जळगाव येथील निवृत्त कर्नल लतिफ मजीद सालार यांचे निधन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope: राशीभविष्य, बुधवार ३ जुलै २०२४ !

July 3, 2024

दिवाळीअगोदर गरिबांसाठी आणखी एक पॅकेज?

October 30, 2020

रावेर हत्याकांड : ५ संशयितांना अटक

October 16, 2020

गुड शेपर्ड स्कुलमध्ये महामानवाला अभिवादन

April 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group