नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) आई-वडील आणि मुलगा एकाच कुटुंबात तीन दिव्यांग…तशात वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आईसह आपला उदरनिर्वाह कसा होणार?, या विवंचनेत असणाऱ्या अपंग तरुणाकच्या मदतीला पालकमंत्री गुलाबराव पाटील हे धावून आले. कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न कायमचा सुटावा, यासाठी नांदेड येथील महेंद्र बाविस्कर या तरुणाला किराणा दुकानासाठी पालकमंत्र्यांनी नुकतीच भरीव आर्थिक मदत केली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे नांदेड गावात एका कार्यकर्त्याच्या घरी द्वारदर्शनासाठी नुकतेच आलेले होते. त्यावेळेस त्यांना गावातीलच बळीराम बाविस्कर (वय ५२) यांचे निधन झाल्याचे कळाले. बाविस्कर परिवारात आई-वडील आणि मुलगा असं तिघंही जण अपंग आहेत. तशात बळीराम बाविस्कर यांचे निधन झाल्यामुळे मुलगा महेंद्र याच्यासमोर आईसह त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला होता.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सर्व हकीगत सांगताच त्यांनी लागलीच गाडी बाविस्कर यांच्या घराकडे वळवली. घरी गेल्यावर महेंद्र याचं सात्वन केले. तसेच आईसह त्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न कायमचा सुटावा, यासाठी किराणा दुकान टाकता यावे म्हणून सामान भरण्यासाठी चांगली आर्थिक मदत केली.
एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संबंधित परिवारावर पूर्ण लक्ष देण्यास सांगितले. प्रचंड आक्रमक मानले जाणारे गुलाबराव पाटील यांच्यातील हळव्या व्यक्तिमत्वाची झलक बघून यावेळी कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते. यावेळी युवा सेनेचे उप तालुकाध्यक्ष भरत सैंदाणे, युवा उद्योजक निर्मलभाऊ नेमाडे, महेश रायसिंगे, युवासेना शाखा अध्यक्ष गोकुळ सैंदाणे, ग्रामपंचायत सदस्य संजय सैंदाणे, गजानन सैंदाणे, भटू सैंदाणे, गिरीश पाटील, गभा भोई यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.