चोपडा (प्रतिनिधी) महिलेचा आंघोळ करतांनाचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पिडीतेकडे २५ हजाराची मागणी केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नरडाणा येथून चोपडा शहर पोलीस स्थानकात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. दीपक नानाभाऊ बोरसे (वय-२५, रा. गव्हाणे ता. शिंदखेडा जि.धुळे) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलेय की, १० मार्च २०२१ रोजीच्या पूर्वी पिडीत अंघोळ करत असतांना संशयित आरोपी दीपक बोरसे याने निवस्त्र अवस्थेतील फोटो काढून घेतले. त्यानंतर संशयित आरोपी दीपकने पिडीतेच्या व्हाट्सअॅप नंबरवर तिचे निवस्त्र अवस्थेतील फोटो पाठवून व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच वारंवार फोनकरून अश्लील शिवीगाळ करत पिडीतेकडून २५ हजाराची मागणी केली. एवढेच नव्हे तर, पोलिसात तक्रार केली तर मी आत्महत्या करून घेईल अशी धमकी दिली. याप्रकरणी अॅट्रॉसिटी, विनयभंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भास्करराव डेरे हे करीत आहेत.