धरणगाव : तालुक्यातील पिंपळे बुद्रुक गावाच्या सरपंचपदी सुनंदा कैलास पाटील यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी सुनंदा पाटील यांचा सत्कार केला तसेच गावातील रस्ते काँक्रिटीकरण करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.
धरणगाव तालुक्यातील पिंपळे बुद्रुक ग्रामपंचायत येथील सरपंच कविता पाटील यांनी आज (दि. 31) रोजी सरपंच पदाचा राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या पदावर शिंदे गटाच्या सुनंदा कैलास पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी पिंपळे खुर्द बुद्रुक गावाच्या राम मंदिरापासून ते महालक्ष्मी माता मंदिरापर्यंत गावापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी दिले.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रमोद पाटील, माजी सरपंच विनोद प्रकाश पाटील, सदस्य समाधान तुकाराम पाटील, उपसरपंच किरण मनोहर पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख दीपक भदाणे, शाखा प्रमुख ललित पाटील, ग्रामसेवक सी. एन. सोनवणे, निवडणूक अधिकारी व समस्त गावकऱ्यांची उपस्थिती होती.