धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री खु येथील वेदमाता गायत्री बाहुउद्देशिय संस्था संचलित आदर्श बालक विद्यामंदिर, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडिअम स्कूल, आदर्श प्राथमिक शाळा, आदर्श माध्यमिक शाळा येथे कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी वेदमाता गायत्री बहूउद्देशीय संस्थेचे सचिव श्री विनोद चौधरी यांच्याहस्ते प्रतिमपूजन करण्यात आले. आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही एम चौधरी, उपशिक्षक आर आर पावरा, एस के शिंदे, आर एस पाटील, एस ए पटेल, जितेंद्र पाटील, सचिन पवार, मनीषा पाटील, करणसिंग पाटील, रंजना बोरसे, आम्रपाली मोरे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी सौरभ देसले, शिपाई, सुदर्शन चव्हाण, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.