बीजिंग (वृत्तसंस्था) चीनमध्ये एक प्रवासी विमान कोसळ्याची (Air Plane Crash) घटना घडली आहे. 133 प्रवाशांना घेऊन जाणारे चायना ईस्टर्न एअरलाईंसचे बोईंग-737 जातीचे एक विमान गुआंग्शी शहरालगतच्या डोंगर रांगांत कोसळले.
या अपघातात किती प्रवाशी ठार झाले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, घटनास्थळावरील चित्र पाहता बहुतांश जण होरपळून दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे विमान 2 मिनिटांपेक्षा कमी वेळात तब्बल 30 हजार फूट खाली आल्याचे सांगितले जात आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान बोईंग-737 जातीचे आहे. या जातीच्या विमानांना यापूर्वीही अनेक भीषण अपघात झाले आहेत.
‘फ्लाईट-5735’ ने सोमवारी दुपारी 1.15 च्या सुमारास कुनमिंग चांगशुई विमानतळावरुन गुआंगझोऊच्या दिशेने उड्डाण केले होते. ते 3 च्या सुमारास आपल्या इच्छित स्थळी पोहोचणे अपेक्षित होते. पण, मध्येच ते कोसळले. अपघातग्रगस्त विमान मागील साडेसहा वर्षांपासून कंपनीच्या ताफ्यात होते. या अपघाताविषयी चायना ईस्टर्न एअरलाईंसचे अद्याप कोणतेही निवेदन केले नाही.















