TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘कविता माणसाच्या जाणिवा प्रगल्भ करतात’ ; अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबोधनमालेत कवी नितीन देशमुख यांचे प्रतिपादन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) कवितेने समाजाचे हजारो वर्षांपासून प्रबोधन केले आहे.कविता माणसाच्या जाणिवा प्रगल्भ करण्याचे काम करतात.’’अश्रुना जर पंख जरासे लावून घेता आले असते, या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकन देता आले असते, या हृदयाच्या जखमा जर का त्या हृद्याला कळल्या असत्या, माणुसकीला उंचीवरती सहजच नेता आले असते’’. एकेमकांचे दुःख जर का समजून घेता आले असते तर जगणे किती सुंदर अझाले असते, आणि त्यातून जगण्याच्या जाणिवा समृद्ध झाल्या असत्या असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी नितीन देशमुख यांनी केले. मंगळवार रोजी अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ऑनलाईन प्रबोधन मालेचे द्वितीय पुष्प गुंफण्यात आले यावेळी ‘प्रश्न टांगले आभाळाला’ या विषयावर ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रघुनाथ आप्पा सोनवणे आणि देशदूतचे संपादक हेमंत अलोने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प समन्वयक संजय भटकर यांनी उपक्रमाची रूपरेषा मांडली. तर रघुनाथ आप्पा सोनवणे यांनी आई-वडिलांची सेवा हीच आपली संपत्ती असल्याचे मनोगत व्यक्त केले.शहराची श्रीमंती ही सांस्कृतिक जडण घडण, सांस्कृतिक वारसा आणि सांस्कृतिक उपलब्धी यावर ठरत असते.उपक्रम अनेक सुरु होतात पण त्यात सातत्य ठेवणे महत्वाचे आणि कौतुकास्पद आहे अश्या भावना देशदूतचे संपादक हेमंत अलोने यांनी व्यक्त केल्या.समारोपीय मनोगतात तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी कवी हे जगण्याच्या जाणिवा समृद्ध करून समाजाला दिशा देण्याचे काम करतात अश्या सवेंदनशील भावना व्यक्त केल्या.

READ ALSO

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

गझलेतून जीवन जगण्याची जाणीव

‘’जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणार्‍याला नाही, जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही’’ ‘प्रश्न टांगले आभाळाला’ या गझलेतून कवी नितीन देशमुख यांनी जीवन जगण्याची जाणीव करून दिली. जीव पेरला मातीमध्ये पत्थर छातीवरती, प्रश्न टांगले आभाळाला उत्तर माती वरती यातून त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि आशा मांडल्या. कवितेतून फक्त प्रश्न मांडू नयेत तर उत्तर देखील शोधता आली पाहिजे.’’हल्ली स्वप्ने मातीवरती रांगत नाही, म्हणून आता घरात गरपं नाही, उजेड देणारी ती झाडे विझुन गेली, घरात आता आजी गोष्टी सांगत नाही’’. डिजिटल युगात गती आली आहे.पण आपण स्थिरता, गावखेड्यातील पार, फुरसत,सामंजस्य आणि आपले पानांची जाणीव गमावून बसलो आहे अश्या भावना नितीन देशमुख याने व्यक्त केल्या

उपक्रमासाठी जळगावचे कलारसिक विघ्नहर्ता कंस्ट्रक्शनचे अजय बढे यांचे सहकार्य लाभले तर दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन आणि अमोल हरिभाऊ जावळे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प सहसमन्वयक देव सरकटे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, राजू वारके यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी केले. आभार प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
Next Post

Omicron चा धोका : आतापासूनच पोलिसांची गस्‍त ; यंदाही ‘थर्डीफर्स्ट’ सेलिब्रेशन घरातच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतीय बुद्धिबळ महासंघ निवडणुकीत भरत सिंग गटाचा १२-३ ने दणदणीत विजय

January 6, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2026 !

August 12, 2026

साळवा येथे बेघरांसाठी काँग्रेसतर्फे उपोषण आणि ठिय्या आंदोलन

June 10, 2025

18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री ; तुमचा मंत्री कोण?, जाणून घ्या !

August 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group