धरणगाव (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून मोटार सायकल चोरणाऱ्या टोळीला धरणगाव पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले होते. पोलीस तपासात आरोपींची संख्या पोहोचली ८ वर पोहोचली आहे. दरम्यान, सर्व संशयित आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या संदर्भात अधिक असे की, मागील काही दिवसापासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून मोटार सायकल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. तेव्हापासून पोलीस चोरट्यांच्या मागावरच होते. परंतू गुरुवारी (१९ मे) मध्यरात्री चोरट्यांनी चक्क एका पोलीस अधिकाऱ्याचीच दुचाकी लांबवली. त्यानंतर पोलिसांनी काही संशयिताना पकडले. त्यात १) यश दिनेश सातपुते २) तुषार बत्तीसे ३) वैभव उर्फ विक्की हेमंत चौधरी ४) मनीष ऊर्फ भुर्या योगेश चौधरी ५) सय्यद पीरण सय्यद मुख्तार यांचा समावेश होता. दरम्यान, या संशयितांनी धुळे येथे ज्यांना मोटार सायकल विकल्या अशा ६) वैभव उर्फ दादू सुरेश मोरे ७) हसन उर्फ अली मोहम्मद शेख ८) वसीम शेख बिस्मिल्ला यांना देखील पोलीसांनी अटक केली आहे. पोलिसांनी धरणगाव व धुळे येथून आरोपीसह ४ मोटर सायकली व ३ मोटरसायकलींची कापलेली स्पेअर- पार्ट असे जप्त केले आहेत. वरील संशयित धरणगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ०१५२/२०२२ भा.द.वि कलम.३७९, ४११,३४ प्रमाणे मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत.
यांनी केली कारवाई
पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांच्यासह धरणगाव पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकातील उमेश पाटील, समाधान भागवत, विनोद संदांशिव, गोपनीय विभागातील वैभव बाविस्कर, अशानी गुन्ह्याची उकल करण्याची कामगिरी बजावली आहे. तसेच तपास कामात धरणगाव पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागातील श्यामराव भिल, प्रमोद यांनी सहकार्य केले.
















