मुंबई (प्रतिनिधी) मराठा समाजाबाबत लज्जास्पद वक्तव्य करणारे निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना तातडीने अटक करून सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असे आश्वासन मराठा क्रांती मोर्चाचे महेश डोंगरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे महेश डोंगरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाच्या बाबतीत अत्यंत लज्जास्पद व अपमान जनक वक्तव्य करणारे निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांच्यावर तातडीने अटक करण्याबाबत व त्याला सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे. किरण कुमार बकाले यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सोशल मीडियावर मराठा समाजाच्या महिलाबाबत अत्यंत असशील लज्जास्पद व अपमान जन्म वक्तव्य करून अपमानित केले आहे.
याबाबत समाजात प्रचंड असंतोष आहे आपण जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आपल्याला अनेक निवेदन सुद्धा देण्यात आली होते. बकालेवर गंभीर गुन्हा दाखल असतानाही व जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन नाकारूनही सुद्धा पोलीस यंत्रणा बकालेला पाठीशी घालत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या बंधू भगिनींमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.
बकालेच्या विरोधात जळगाव शहरात प्रचंड मोर्चा सुद्धा काढण्यात आला. सदर पोलीस अधिकारी बकाले यांनी केलेल्या बेलगाम वक्तव्यांची माहिती जळगाव जिल्ह्यातील मराठा बांधव यांनी बकाले संदर्भात फोन करत बकाले बडतर्फ करण्याची मागणी मला दूरध्वनीद्वारे अशोक शिंदे, लक्ष्मण शिरसाट ,हितेश टकले , नंदू रायगडे यांनी यांना केली आहे. सदर विषयाचा निषेध म्हणून लोकशाही मार्गाने आंदोलन सुद्धा जिल्हाभर सुरू होते . पोलीस विभागातर्फे बकाले ला पूर्णपणे पोलीस विभागातील अधिकारी संरक्षण देत असल्याची चित्रे दिसत होती. अनेक समाज बांधवांमध्ये बकाले यांना पोलीस विभाग पाठीशी तर घालत नाही असाही समाजामध्ये संभ्रम तयार झाला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ बकालेच्या बाबतीत तातडीने गंभीर कारवाई करून त्याच्या अटकेचे आदेश पोलीस दलात द्यावे अन्यथा या संदर्भामध्ये मराठा समाजामध्ये प्रचंड गैरसमज निर्माण होईल. तरी कृपाया आपण तातडीने दखल घ्यावी. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी तात्काळ पोलीस महासंचालक यांना बकाले यांना बळतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.