जळगाव (प्रतिनिधी) रायपुर येथे प्राथमिक शाळेच्या भिंतीच्या आडोशाला सुरू असलेल्या झन्ना-मन्ना जुगार अड्ड्यावर छापा टाकून एमआयडीसी पोलिसांनी पाच जुगाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १२६० रुपयाची रोकड जप्त करण्यात आलीय.
या संदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पो.हे.कॉ. सिद्धेश्वर शिवाजीराव डापकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली होती की, रायपूर गावी प्राथमिक शाळेच्या भिंतीच्या आडोशाला काहीजण जन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत आहेत त्यानुसार श्री लोकरे यांनी मला व पो.ना.सचिन मुंडे, पो.हे.कॉ. सतीश गरजे,पो.हे.कॉ. चंद्रमोहन सोनवणे अशांना घटनास्थळी जाऊन चौकशी करण्याची सूचना केली. त्यानुसार आम्ही सर्वजण घटनास्थळी गेलो असता त्याठिकाणी काहीजण गोलाकार करून झन्ना- मन्ना नावाचा जुगार खेळताना दिसले. आम्ही लागली धापा टाकत विशाल भगवान सुरवाडे (रा. रायपूर), धनसिंग भोंदू राठोड (रा.सुप्रीम कॉलनी), राकेश संजय पाटील (रा. दत्त मंदिराजवळ, कुसुंबा), गणेश शिवाजी शिंदे (रा. कुसुंबा), दिनेश भास्कर खैरनार (रा. कुसुंबा) अशांना ताब्यात घेतले. या सर्वांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून १२६० रुपयाची एकूण रोकड जप्त करण्यात आली. याचबरोबर पत्ता जुगाराची साधने मोटार सायकल देखील जप्त करण्यात आली आहे. संबंधित आरोपींविरुद्ध मुंबई जुगार अधिनियम कलम १२ (अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
















