जळगाव (प्रतिनिधी) येथील पोलीस वसीम मलिक यांनी आपल्या मुलीचा तिसरा वाढदिवस पुन्हा एकदा अनोख्या पध्दतीने साजरा केला.
पहिल्या वाढदिवसी (२०१९) आपल्या मुलीला गरीब आजारी लोकांची जाण व्हावी म्हणून सिविलमधील गरीब रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी मारियाच्या हाताने जेवण देऊन साजरा केला होता. त्यानंतर दुसऱ्या वाढदिवसी (२०२०) आपल्या मुलीला पर्यावरणाबद्दल प्रेम व जवळीक व्हावी या उद्देश्याने त्यांनी मारियाच्या हाताने वृक्षरोपण करुन परिसरात १०० च्या वर झाडे लावली होती.
आणि आता पुन्हा यावर्षी वसिम मलिक यांनी आपली मुलगी मारिया मलिक हिच्या तिसऱ्या वाढदिवशी जळगाव शहरातील निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, फ़ूड बैंकच्या मदतीने जळगाव शहरातील टॉवर चौक, रेल्वेस्टेशन परिसर, इच्छापूर्ति गणपति मंदिर, भंगार बाजार, नवी पेठ, मेहरूण परिसरातील गरीब वस्ती अशा विविध भागातील रस्त्यांवरील बेघर व निराधार गरीब आजी-आजोबा तसेच इतर लोकांना मारियाच्या हाताने जेवण वाटप करण्याचे कार्य भर पावसातही साजरा केला.