मुक्ताईनगर (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांशी योजना ‘सर्वांसाठी घर’ अंतर्गत रावेर लोकसभा क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)च्या ई.डब्ल्यु.एस/एल.आय.जी. अंतर्गत गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मूलन मंत्रालयामार्फत निधी मंजूर करण्यात आलेला असुन यासाठी खासदार रक्षाताई खडसे यांचा यासाठी वेळोवेळी पाठपुरावा चालू होता.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) ई.डब्ल्यु.एस/एल.आय.जी. अंतर्गत बोदवड येथे २०९ घरांसाठी रु.१२२.४० लक्ष, चोपडा येथे १३५ घरांसाठी रु. ८१.० लक्ष, मुक्ताईनगर येथे १०२ घरांसाठी ५६.४० लक्ष, वरणगाव येथे १०४ घरांसाठी रु.४९.८० लक्ष व मलकापुर २०० घरांसाठी रु.११९.० लक्ष असा एकूण रु.४२८.६० लक्ष निधी मंजुर करण्यात आलेला असुन, त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे. अशी माहिती खासदार संपर्क कार्यालय, मुक्ताईनगर यांचे कडून देण्यात आली.