पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) नवरात्री उसत्व जवळ येत असल्यामुळे माता भगिनींना त्रास होऊ नये, यासाठी प्रतापराव पाटील हे अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी पाळधी गावातील पथ दिव्यांची नुकतीच तात्काळ दुरुस्ती करून घेतली.
पाळधी खु. गावातील मध्यवर्ती भागात असलेले पथदिवे काही दिवसांपासून बंद होते. नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे नागरिकांनी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व सरपंच शरद कोळी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेत क्रेन मागवून लगेच रात्री 10 वाजता सर्व कर्मचाऱ्यांना बोलवून घेत हातोहात सर्व पथदिवे बदलण्याचे काम करून घेतले.
तसेच पुढील टप्प्यात वानखेडे गॅरेज ते बायपासपर्यंत नवीन हायमास्ट पथदिवे बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. तक्रारीची तात्काळ दाखल घेऊन काम मार्गी लावल्या बद्दल नागरिकांनी प्रतापराव पाटील यांचे आभार मानले. याप्रसंगी सरपंच शरद कोळी, चंदू माळी, भाईदास माळी, अमीन पटेल,पवन माळी, चंदू पवार,दिनेश कडोसे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते,
















