TheClearNews.Com
Friday, July 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात महात्मा बळीराजा गौरव दिन उत्साहात साजरा (व्हिडीओ)

शेतकरी सुखी तर जग सुखी : ना. गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
November 6, 2021
in कृषी, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील साने पटांगणावर महात्मा बळीराजा लोकोत्सव समितीच्या वतीने जगाचा पोशिंदा, लोककल्याणकारी, महात्मा बळीराजा गौरव दिनानिमित्त बळीराजाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी केले. प्रास्ताविकात महात्मा बळीराजा यांच्या काळात शेतकरी अतिशय सुखी व समाधानी होता. लोककल्याणकारी राजा म्हणून बळीराजाची ख्याती होती, म्हणूनच दिवाळी सणामध्ये घराघरातील माता-भगिनी म्हणतात – “इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो” अशा महान राजाच्या कार्याबद्दल ग्रामस्थांना विस्तृत अशी माहिती सांगितली. तसेच याप्रसंगी पाटील सरानी आपल्या शहरात महात्मा बळीराजाचे भव्यदिव्य स्मारक व्हावे, अशी अपेक्षा बळीराजा लोकोत्सव समितीच्या वतीने व्यक्त केली. याप्रसंगी बळीराजाची आठवण यावी म्हणून प्रभाकर पाटील या शेतकरी बांधवाने नांगर ला झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले.

READ ALSO

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे डी. जी. पाटील यांनी महात्मा बळीराजा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. बळीराजा आपले दैवत आहेत त्यांची संस्कृती आपण जोपासली पाहिजे. कृषिप्रधान देशात शेतकऱ्याची अवस्था दुर्दैवी झाली आहे. पुन्हा एकदा बळीराजाचे राज्य यावे अशा आशा व्यक्त केल्या. प्रा. बी. एन. चौधरी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून शेतकऱ्याला उभे केले पाहिजे. डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी शेतकऱ्याने कच्च्या मालापासून पक्का माल तयार करून बाजारात विकून स्वावलंबी झाले पाहिजे. माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा माळी यांनी सांगितले, शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करून मोठे व्हावे, असेही मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, आपल्या शहरात बळीराजाचे स्मारक नक्कीच उभारता येईल, आपण जागा सुचवावी त्यासंदर्भात आम्ही शासकीय कागदपत्रांचा पाठपुरावा करून योग्य ती मदत करण्यास तत्पर आहोत, असेही यावेळी गुलाबराव वाघ म्हणाले. आजच्या या बळीराजा लोकोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणी पुरवठा तथा स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील होते. याप्रसंगी ना. पाटील म्हणाले की, शेतकरी सुखी तर जग सुखी आणि मी सुद्धा बळीराजाचा पुत्र आहे. सध्याचे महाविकास आघाडी सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहील, असे प्रतिपादन करत सर्व बांधवांना बळीराजा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, भा. रा. काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील, लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते धनराज मोतीराया, राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, चर्मकार महासंघाचे नेते भानुदास विसावे, नगराध्यक्ष निलेश चौधरी, जेष्ठ साहित्यिक प्रा.बी.एन.चौधरी, डॉ. संजीवकुमार सोनवणे, राष्ट्रवादीचे नेते दिपकराव वाघमारे, माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा माळी, पाटील समाजाचे अध्यक्ष भिमराज पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष ऍड. व्ही. एस.भोलाणे, जेष्ठ पत्रकार कडू रूपा महाजन, मोतीआप्पा पाटील, राजेंद्र ठाकरे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते विनय भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश (बुट्या) महाजन, भागवत चौधरी, विलास महाजन, माजी नगरसेवक निलेश चौधरी, राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख, साई लॅबचे महेश पाटील, श्री पॅथॉलॉजीचे नरेंद्र पाटील या सर्व मान्यवरांच्या हस्ते महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेचे व नांगराचे पूजन करण्यात आले.

भाजपा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष संजय महाजन, माजी नगरसेवक अभिजित पाटील, व्ही. टी. माळी, धिरेंद्र पुरभे, विजय वाघमारे, वाल्मिक पाटील, महेंद्र (भैय्या) महाजन, प्रभुदास (बालू) जाधव, महेश (बंटी) पवार, मोहन महाजन, प्रशांत देशमुख, राजू पाटील, संतोष भडांगे, व्यापारी सेनेचे दिनेश येवले, धनंजय कापडणे, रविंद्र कंखरे, राहुल रोकडे, प्रदीप मराठे आदी मान्यवरांनी महात्मा बळीराजाच्या प्रतिमेसह नांगराचे ही पूजन केले. बळीराजा महोत्सव कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे जगदंबा टेंटचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार महात्मा फुले हायस्कुलचे हेमंत माळी यांनी मानले.

बळीराजा लोकोत्सव गौरव दिन कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आबासाहेब राजेंद्र वाघ, हेमंत डी. माळी, किशोर पवार, प्रा. रविंद्र मराठे, लक्ष्मण पाटील, आनंद पाटील, विक्रम पाटील, दिनेश भदाणे, निलेश पवार, गौतम गजरे, प्रफुल पवार, राहुल पाटील, गोकुळ पाटील, मुन्ना पाटील यांनी परिश्रम घेतले. यावेळी धरणगाव शहर व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
धरणगाव

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
धरणगाव

प्रभाग 10 मधील जीर्ण मटण मार्केट स्थलांतरित करण्याची नगरसेवक गुलाब मराठे यांची मागणी…!

July 16, 2026
Next Post

जिल्हा बँक निवडणूक : नाना पाटलांची याचिका फेटाळली ; खडसेंची बिनविरोध निवड निश्चित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कल्पेश पवार यांची रावेर लोकसभा विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

October 14, 2023

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 5 फेब्रुवारी 2024 !

February 5, 2024

Uniqlo to Open One of Region’s Biggest Outlets in Bali

July 13, 2020

धक्कादायक : पत्नी पतीला सतत सांगत होती, तरीही सासरा करत होता बलात्कार

October 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group