धरणगाव (प्रतिनिधी) येथील बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी गुढी पाडवा नववर्ष निमित्त स्वागत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. परंतु गेली दोन वर्ष कोरोना महामारी सुरू असल्याकारणाने कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम झाले नाहीत. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून सार्वजनिक कार्यक्रम सुरू झाले आहेत म्हणून या वर्षी २ एप्रिल शनिवार रोजी वर्षप्रतिपदा गुडीपाढवा नववर्षाची स्वागत मिरवणूकीची जय्यद तयारी असून चैत्र शुक्ल प्रतिपदा श्री शालीवाहन शके १९४४ दि. २ एप्रिल रोजी सकाळी ७.०० वाजता भव्य मिरवणूकीचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी शिस्तीत कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून सांस्कृतिक मिरवणूक होणार आहे. यासाठी गावातील सर्व सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालये, क्रिडा मंडळे, लेझिम मंडळे, महिला मंडळे, किर्तनकार, भजनी मंडळे तसेच सर्व राजकीय पक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रा.डी.आर. पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, सचिव राजेंद्र आनंदा पवार यांनी केले आहे
मिरवणूक मार्ग श्री बालाजी मंदिर- धरणी चौक- बाजारपेठ कोट बाजार- श्रीराम मंदिर- परिहार चौक- नेताजी रोड- कावरे यांचे घर- धरणी पुल- मराठे गल्ली-बजरंग चौक- श्री बालाजी मंदीरात आरती व प्रसाद असे कार्यक्रमाचे नियोजन राहील. मोठ्या संख्येने मिरवणुकीत उपस्थित राहण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे.