मुंबई (वृत्तसंस्था) ठाणेकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी उभारण्यात येणारे मेट्रो मार्ग ४ आणि ४ अ हे दोन्ही प्रकल्प वेळेत पूर्ण होणार आहेत. केएफडब्ल्यू या जर्मन विकास बँकेकडून दोन्ही मार्गिकांसाठी ५४५ दशलक्ष युरोचं कर्ज मंजूर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मेट्रो लाइन ४ म्हणजे वडाळा ते कासारवडवली आणि मेट्रो लाइन ४ अ मध्ये कासारवडवली ते गायमुख अशा मार्गिका तयार करण्यात येणार आहेत. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार मंजूर निधीमधून मुंबईच्या मेट्रो लाईनसह, मेट्रो स्थानकांच्या आसपासचे फुटपाथ आणि सायकल मार्गांचा समावेश असणारे. तसेच ३४ किलोमीटर लांबीची मेट्रो लाइन ४ ही शहराच्या उत्तर – दक्षिण भागाची कनेक्टिव्हिटी करेल, यामुळे मुंबई आणि ठाणे जोडले जाणार आहे. यासंदर्भातील करारावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. मुंबईकरांसोबतच ठाणेकरांचाही दैनंदिन प्रवास आरामदायी आणि गतिमान होण्यासाठी उपयुक्त ठरणारा मेट्रो मार्गिका ४ आणि ४ अ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगर परसिरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत हा प्रकल्प आमूलाग्र बदल घडवेल. या प्रकल्पासाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यु विकास बँकेकडून कर्ज करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. ठाणेकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मेट्रो मार्ग ४ आणि ४ अ या दोन्ही प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे.