धरणगाव (प्रतिनिधी) येथील प.रा. हायस्कूल सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विषयाचे प्राध्यापक संजय शिंगाणे यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेअंतर्गत इतिहास विषयात पीएचडीची पदवी प्रदान करण्यात आली.
यावेळी बहिस्थ परिक्षक म्हणून सोलापूर येथील वालचंद महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉ. चंद्रकांत चव्हाण व चेअरमन मारवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले होते. प्रा. संजय शिंगाणे यांनी स्थानिक इतिहासाला चालना देण्यासाठी ‘ब्रिटिशकालीन एरंडोल परगण्यातील व्यापार व उद्योगांचा एक ऐतिहासिक अभ्यास (इ.स.१८१८ ते १९४७) या विषयावर शोधप्रबंध सादर केला. त्यांना शेंदुर्णी येथील अ.र.भा. गरुड महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा.डॉ. प्रशांत देशमुख यांचे अनमोल मार्गदर्शन व प्रा. डॉ. संजय पाटील यांचे सहकार्य लाभले. प्रा.डॉ. संजय शिंगाणे यांच्या यशाबद्दल प.रा. हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, उपाध्यक्ष व्हि.टी. गालापुरे सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संस्थेचे संचालक अजयभाऊ पगारिया व सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी.एस.बिराजदार तसेच प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कार्यालयीन कर्मचारी तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डी.आर. पाटील, प्रा.आर.एन. महाजन व त्यांचे मित्र कैलास माळी, महेश आहेराव, संतोष सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.