धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरातील सार्वजनिक मुताऱ्या- संडाशी हफ्त्यातून एकदा तरी अॅसिडने स्वच्छ करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय एकनाथ माळी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
संजय एकनाथ माळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक मुताऱ्या व संडाशी तंबाखू व गुटखा खाणा-यामुळे खूप घाण झाल्या आहेत. तरी त्या फक्त पाणी टाकून स्वच्छ होत नाहीत. तरी स्वच्छ करण्यासाठी अॅसिडचा वापर करावा ही विनंती. कारण दिवसेंदिवस घाण जास्तच साचत चाललेली आहे. त्यामुळे रोगराई वाढू शकते. तरी सदर विषयावर त्वरित कार्यवाही करावी, असेही एकनाथ माळी यांनी निवेदनात म्हटले आहे.