धरणगाव (प्रतिनिधी) आजीचं निधन आणि तिच्या अंत्यविधीनंतर ‘मतदार संघ हेच आपले कुटुंब’ ही भावना मनात ठेवत प्रतापराव पाटील यांनी स्वत:चे दुख बाजुला सारत निशाने व बोरखेडा या दोन गावात झालेल्या निधनांच्या ठिकाणी ते द्वारदर्शनाला गेले. काही दिवसापूर्वीच प्रतापराव पाटील यांच्या आजीचे निधन झाले होते.
ऑगस्ट महिन्यात गण दौऱ्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी सलग १५ दिवस मतदार संघातील गावांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. संबधित अधिकाऱ्यांना सुचना देऊन लागलीच कामांचे नियोजन केले. या दौऱ्यांमुळे नागरीकांना आपल्या मनातील विचार बोलण्यास प्रवृत्त केले. विकास कामांचा आढावा घेऊन नवीन कामांचे नियोजन नागरीकांच्या समोर केले. दौरे संपताच लागलीच ६ सप्टेंबर रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या आजी यांचे दुख:द निधन झाले.
यामुळे घरात दुखाचे वातावरण पसरले आहे. आजीची दशक्रिया विधी देखील झालेला नाही. तोपर्यंतच पालकमंत्र्यांनी घालून दिलेल्या आदर्शनुसार ‘मतदार संघ हेच आपले कुटुंब’ या शिकवणीतून प्रतापराव पाटील यांनी स्वत:चे दुख बाजुला सारले. निशाने व बोरखेडा या दोन गावात झालेल्या निधनांच्या ठिकाणी ते द्वारदर्शनाला गेले. आपले दुख: विसरुन दुसऱ्यांच्या दुखात सहभागी होऊन त्यांना धीर देण्याचे काम प्रतापराव पाटील यांनी केले. वडीलांनी घालुन दिलेल्या आदर्शानुसार प्रतापराव पाटील यांचा प्रवास सुरू आहे. यामुळे नागरीकांमध्येही आपल्या नेत्यांबाबत विश्वास दृढ झाला.