जळगाव (प्रतिनिधी) येत्या रविवारपासून पुढील तीन दिवस उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता अाहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ अाणि मराठवाड्यात पाऊस हाेईल.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या २८ अाॅगस्टपासून ३१ अाॅगस्टपर्यंत उत्तर महाराष्ट्रात विशेषत: जळगाव जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रिय हाेऊ शकताे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६५ टक्क्यापर्यंत पाऊस झालेला असून पुढील महिन्यापर्यंत उर्वरित ३५ टक्के पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते अाहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाचा मुक्काम अाॅक्टाेबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत कायम राहत असल्याचा अनुभव अाहे. असे झाल्यास यंदाही पाऊस वार्षिक सरासरी अाेलांडण्याची शक्यता वर्तवण्यात अाली अाहे.
मध्यम प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ७३.३७ टक्के तर तीन माेठ्या प्रकल्पांमध्ये ७०.९९ टक्के जलसाठा अाहे. गिरणा प्रकल्प, अभाेरा, मंगरूळ, सुकी, ताेंडापूर अाणि बाेरी हे प्रकल्प फुल्ल झाले अाहेत. हिवरा, अग्नावती अाणि भाेकरबारी या तीन प्रकल्पांमध्ये मात्र अजूनही जलसाठा २० टक्क्यांपुढे गेलेला नाही. वाघूर धरणही अजून पुरेसे भरलेले नाही.