धरणगाव (प्रतिनिधी) राजस एंटरटेनमेंटचे बहुचर्चित “प्रेम दिवाणी” गाणे प्रदर्शित करण्यात आले असून गाण्याचा ट्रेलरला १ दिवसात ४५ हजार लोकांनी बघितले आहे.
तमाम लोकांच्या आग्रहास्तव गाणे राजस एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित केले, खूप अशी मेहनत संपूर्ण टीमने या गाण्यासाठी घेतली. या गाण्याचे निर्माता डीजे गोलू धरणगाव व डीजे लखन हे असून दिग्दर्शन व कथा डीजे गोलू यांनी केले आहे. लेखक भैय्यासाहेब मोरे, नाशिक (कर मन्ह लगीन फेम) हे असून सह लेखक परमेश्वर रोकडे (कलाशिक्षक बालकवी ठोबरे शाळा धरणगाव) यांनी केले आहे. संगीत पवन धनगर (राधे बँड अंबाडे ता.चोपडा), रिधम / मिक्स मास्टरींग डीजे गोलू, गायक अंजना बारलेकर (तूना प्यार मा पागल व्हनीरे फेम) व सचिन सोनवणे (लख लख सोनानी तलवार फेम) यांनी केले असून श्रावणी मोरे नाशिक, सचिन पाटोळे शिंदखेडा, दिव्यानी माळी पुणे यांनी मुख्य कलाकार म्हणून काम केले आहे. निलेश पाटील, लखन हिरे, क्षितीज सोनवणे, श्रेया पाटील, चि, मनीष चौधरी, समाधान माळी, सौ. मिराताई महाजन यांनी सह कलाकार म्हणून काम केले आहे. छायाचित्रीकरण मनोज पाटील (डिलाईट फोटोग्राफी, जळगाव), एडिटिंग आकाश आरगडे व लखन हिरे, डी. आय./ कलर पंकज सालमुठे, नाशिक यांनी उत्कृष्टपणे केलेले आहे.
गाण्याचे पोस्टर निलेश पाटील (राजस ग्राफिक्स धरणगाव) तसेच या गाण्याला प्रमोद मोर व बाबू मोरे (पैसावाली ताई गाणे फेम), डॉ. धिरज पाटील (आराधना हॉस्पिटल, धरणगाव), प.रा. विद्यालय संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगाव, श्री. अविनाश चौधरी (गणेश ऍम्ब्युलन्स सर्व्हिस, धरणगाव), गौरव चौधरी, शुभम चौधरी, पंकज सपकाळे, प्रथमेश कासार, दर्शन भाटीया, मोहित देशमुख, कल्पेश कापुरे, खान्देशातील तमाम कलाकार व समस्त मित्र परिवार यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले आहे. तरी सर्वांनी राजस एंटरटेनमेंटचे बहुचर्चित “प्रेम दिवाणी” गाणे नक्की https://youtu.be/vvZxZuCAQVM या लिंक ला क्लीक करून किंवा Rajas Entertainment या यूट्यूब चॅनल वर नक्की बघा व अशीच साथ असुद्या म्हणजे अजून नवनवीन गाणे आम्ही तुमच्या समोर सादर करू, असे आवाहन गाण्याचे निर्माता डीजे गोलू धरणगाव यांनी केले आहे.