मुंबई (वृत्तसंस्था) आज राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर आता चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राज्यसभेची निवडणूक आता अटळ आहे. भाजपा तिसरी जागा १०० टक्के जिंकेल”, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
“महाविकास आघाडीचे नेते, देवेंद्र फडणवीस आणि मी अशी आमची तासभर चर्चा झाली. राज्यसभेची तिसरी जागा मागे घेण्याच्या बदल्यात विधान परिषदेची एक जागा जास्त देण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीचा होता. त्याबदल्यात आम्ही त्यांना प्रस्ताव दिला की तुम्ही राज्यसभेसाठीची दुसरी जागा मागे घ्या आणि मग विधानपरिषदेची पाचवी जागा आम्ही लढवणार नाही. त्यानंतर आमचा कोणताही संवाद झाला नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. साडेअकरा वाजल्यानंतर कुणीच काही बोललं नाही. आता तीन वाजून गेले आहेत. त्यामुळे निवडणूक आता अटळ आहे. भाजपा ती तिसरी जागा १०० टक्के जिंकेल”, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पुरेसं संख्यबळ त्यांच्याकडेही नाही. कॉमन मतांसाठी दोघेही प्रयत्न करतील. आमच्याकडे ३० आहेत. ४१.०१ असा कोटा आलाय. अतिरिक्त १२ मतं आमच्याकडे आहेत. प्रेफरन्शियल वोटिंग आहे. यात असे इतिहासातले अनेक दाखले आहेत की पहिल्या क्रमांकाची मतं कुणाकडे तरी जास्त आणि कुणाकडे तरी कमी होती. कमी मतं असलेला उमेदवारही जिंकून आला आहे. कारण या पद्धतीत एका मताचा एक दशांश इथपर्यंत मोजण्याची पद्धत आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक जिंकणार याबद्दल खात्री आहे”, असं पाटील यावेळी म्हणाले.