चोपडा (प्रतिनिधी) शहरातील एका भागात राहणाऱ्या दाम्पत्याला मागील भांडणाच्या कारणावरून मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका परिसरातील ३५ वर्षीय विवाहितेला मागील भांडणाच्या कारणावरून परिसरात राहणारे मिलिद इंदासे यांनी विवाहितेच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान पतीला मारहाण होत असल्याचे पाहून विवाहितेने भांडण सोडविण्यासाठी पुढे आली असता, त्याचा राग आल्याने मिलिद इंदासे, सीमा इंदासे, दिपाली इंदासे,सुनंदा इंदासे यांनी विवाहितेला व तिच्या पतीला मारहाण करून तीचा विनयभंग केला. यावेळी विवाहितेला अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली. याप्रकरणी विवाहितेने चोपडा शहर पोलीस स्थानकात धाव घेत संशयित आरोपी मिलिद इंदासे, सीमा इंदासे, दिपाली इंदासे,सुनंदा इंदासे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.