धरणगाव (प्रतिनिधी) आज अश्विन शुद्ध एकादशी या दिवशी निघणारा रथोत्सव मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही स्थगित केला आहे. रथोत्सवाची परंपरा अखंड चालू राहावी म्हणून रथाची यथासांग पूजा केली गेली. श्री बालाजी भगवानांना रथावर विराजमान करण्यात आले.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, नगराध्यक्ष श्री व सौ निलेश चौधरी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, पी. आय. शंकर शेळके, बांधकाम अभियंता ठाकूर, धानोऱ्याचे सरपंच भगवान महाजन, उपनगराध्यक्ष विलास महाजन, विलासनाना येवले, शाम भाटीया व शहरातील पत्रकार बी. एन. चौधरी, आर. डी. महाजन, डी. एस. पाटील, कडू रूपा महाजन, लक्ष्मण माळी, धर्मराज मोरे, विजयकुमार शुक्ला, बी. आर. महाजन यांच्या हस्ते मंदिर प्रांगणात आरती करण्यात आली. त्यानंतर रथ १० फूट ओढला गेला व लगेच पूर्ववत जागेवर आणला.
यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्कचा वापर व सॅनिटायजेशन या गोष्टी कटाक्षाने पाळल्या. रथाची सजावट, रोषणाई करून, जागेवर भाविकांच्या दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली. भाविक भक्तांनी सर्व नियमांचे पालन करून आपले श्रद्धास्थान श्री बालाजी भगवानांचा दर्शनाचा लाभ घेतला. मंडळाचे अध्यक्ष प्रा.डी. आर. पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, जीर्णोद्धार समिती प्रमुख जीवन सिंह बयस, सचिव राजेंद्र पवार, सहसचिव प्रशांत वाणी, अशोक येवले, ध्रृवसिंग बयस, किरण वाणी, शैलेश भाटिया, रवींद्र काबरा, हेमलाल भाटिया, भास्कर मराठे सोबत मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. गावातील सर्व पक्षीय नेते, सर्व समाजातील प्रतिष्ठित उपस्थित होते. बापू पुराणिक, गणेश पुराणिक यांनी पूजा संपन्न केली.
















