पुणे (वृत्तसंस्था) पुण्यात पुन्हा एकदा गवा दिसून आला आहे. बावधन परिसरात गव्याचे दर्शन झाले असून, जवळच डोंगर आणि जंगल परिसर असून, तेथून हा गवा बावधन परिसरात आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात घुसलेल्या गव्याचा मृत्यू झाला होता.
शहरात पुन्हा एकदा रानगवा वस्तीत आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात पुन्हा गवा दिसल्याने भीती व्यक्त होत आहे. हा गवा पाषण तलावाजवळ फिरताना दिसून आला आहे. दरम्यान, नागरिकांना महामार्ग आणि बावधन परीसरात गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. याआधी कोथरुड भागात गवा आला होता. त्याला पकडण्यात यश आले. मात्र, काही तासातच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, याआधी आलेल्या गव्यामुळे अनेकांची पळापळ झाली होती. कोथरुड परिरात गव्यामुळे भीतीचे वातापरण होत. तसेच गव्याला बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी केली होती. वाट चुकलेला रानगवा महात्मा सोसायटीच्या परिसरात सुरुवातीला दिसला होता. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. यावेळी बावधन परिसरात आलेल्या गवा पाहण्यासाठी कोणीही गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. ९ डिसेंबर रोजी पुण्यातील कोथरूड परिसरात गवा दिसला होता. या गव्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि पोलिसांनी प्रयत्न केले. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर गव्याला पकडण्यात यश आले होते. मात्र, थोड्या वेळातच गव्याचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा गव्याचं दर्शन झालं आहे. या गव्याला पकडण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. गवा आढळण्याची ही दुसरी वेळ आहे.
दोरीच्या मदतीनेही गवा ताब्यात येत नव्हता. गव्याला इंजेक्शन देण्यात आले तरी देखील वन कर्मचाऱ्याच्या अधिकार्यांना गव्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं नव्हतं. गवा अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना कोणत्याही प्रकारची दाद देत नव्हता. त्यामुळे जाळीच्या मदतीने त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर दुपारी गव्याच्या तोंडावर कापड टाकून त्याला शांत करण्यात वन अधिकाऱ्यांना यश आलं. पण यानंतर त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली होती.