जळगाव (प्रतिनिधी) आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने २९८ रूग्ण आढळून आले असून ०७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्या ४९ हजार १०४ झाली आहे. तर दुसरीकडे ८०५ रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात करत सुखरुप घरी पोहोचले आहेत. यामुळे आरोग्य प्रशासनाला दिलासा मिळत आहे.
आजची आकडेवारी
जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर- ७६, जळगाव ग्रामीण-११ , भुसावळ- २२; अमळनेर-०६, चोपडा-२५ पाचोरा-०७; भडगाव-०२ ; धरणगाव- ०७; यावल- ०८; एरंडोल-०१ ; जामनेर-०४; रावेर-०७ ; पारोळा-०३; चाळीसगाव-०७ ; मुक्ताईनगर-०७; बोदवड-०५ आणि इतर जिल्ह्यांमधील ०३ असे एकुण २९८ रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९ हजार १०४ इतकी झाली आहे. आतापर्यंत ११९८ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला असून ४३ हजार १४८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.