जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ६४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १५९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ०२, जळगाव ग्रामीण-०५, भुसावळ-०५, अमळनेर-०५, चोपडा-०५, पाचोरा-०४, भडगाव-०१, धरणगाव-०३, यावल-०३, एरंडोल-०२, जामनेर-०४, रावेर-०६, पारोळा-०५, चाळीसगाव-०८, मुक्ताईनगर-०१, बोदवड-०३, इतर जिल्ह्यातील-०२ असे एकुण ६४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४१ हजार ६५८ पर्यंत पोहचली असून १३७ हजार ३६१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५६४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १७३३ रुग्ण सध्या उपचार घेताय.