जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ५२१ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ६६५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ५१, जळगाव ग्रामीण-१३, भुसावळ- ५१, अमळनेर-०४, चोपडा-५४, पाचोरा-०३, भडगाव-०२, धरणगाव-१४, यावल-३७, एरंडोल-१९, जामनेर-७०, रावेर-५०, पारोळा-१५, चाळीसगाव-१७, मुक्ताईनगर-४४, बोदवड-१५, इतर जिल्ह्यातील-०९ असे एकुण ५२१ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १३६ हजार २८५ पर्यंत पोहचली असून १२४ हजार ३४६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २४३८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९५०१ रुग्ण सध्या उपचार घेताय.
दिलासादायक
*जळगाव जिल्ह्यात आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या (१४४ ने) जास्त.
*ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही (१५५ ने) झाली कमी.