जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १०६३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ११०३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १६७, जळगाव ग्रामीण-२१, भुसावळ- ९३, अमळनेर-२०५, चोपडा-९०, पाचोरा-४७, भडगाव-०९, धरणगाव-२०, यावल-२८, एरंडोल-८६, जामनेर-१२६, रावेर-४६, पारोळा-१९, चाळीसगाव-७४, मुक्ताईनगर-०२, बोदवड-२३, इतर जिल्ह्यातील-०७ असे एकुण १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १२० हजार ९९७ पर्यंत पोहचली असून १०८ हजार १२९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २१६३ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १०७०५ रुग्ण सध्या उपचार घेताय.