जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १००७ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १०३० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १४१, जळगाव ग्रामीण-१६, भुसावळ- १०१, अमळनेर-४७, चोपडा-३२, पाचोरा-१४८, भडगाव-०८, धरणगाव-१२, यावल-३१, एरंडोल-५८, जामनेर-११२, रावेर-४७, पारोळा-१७, चाळीसगाव-५८, मुक्ताईनगर-१११, बोदवड-६१, इतर जिल्ह्यातील-०३ असे एकुण १००७ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १२२ हजार ००४ पर्यंत पोहचली असून १०९ हजार १५९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २१८४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १०६६१ रुग्ण सध्या उपचार घेताय.
दिलासादायक
*जळगाव जिल्ह्यात आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या (२३ ने) जास्त.
*ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही (४४ ने) झाली कमी.