जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ८० कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे २४२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ०७, जळगाव ग्रामीण-०३, भुसावळ-०६, अमळनेर-०३, चोपडा-०५, पाचोरा-०८, भडगाव-००, धरणगाव-०१, यावल-०३, एरंडोल-०४, जामनेर-०४, रावेर-०४, पारोळा-०२, चाळीसगाव-२५, मुक्ताईनगर-०२, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०२ असे एकुण ८० रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४१ हजार ३६९ पर्यंत पोहचली असून १३६ हजार ६८४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५६० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर २१२५ रुग्ण सध्या उपचार घेताय.