जळगाव (प्रतिनिधी) शहरातील पिप्रांळा येथील फ्लॅट विक्रीचा व्यवहार ठरलेला असतांना बनावट कागद्पत्राद्वारे फ्लॅटसंदर्भात बनावट सौदापावती केल्याप्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून दिनेश रामचंद्र उर्फ रमेशचंद्र तिवारी, लीलाबाई दिनेश तिवारी (दोघी रा. वासूकमल नंदनवन अपार्टमेंट, मुक्ताईनगर जळगाव), प्रकाश शामलाल कटारिया (बाबा स्वीट मार्ट, फुले मार्केट, जळगाव), अतुल अशोक खरे (रा. ३३२, जोशींपेठ जळगाव), निलेश सुभाष पाटील (रा. कुंभरिसीम, ता. जामनेर), प्रेमसिंग विश्वसिंग पाटील (रा. देवपिप्री, ता. जळगाव), बिरज इंदरचंद जैन (रा. आदर्श नगर, जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, पूजा हरीश झवर (वय ३७ रा. मारवाडी गल्ली, पाळधी, बु. ता. धरणगाव, जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पिंप्राळा येथील गट क्रमांक ३३ पै. पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १०१ फर्निचर व फिटिंगसह फिर्यादी व त्यांच्या पतीच्या मालकीचा आहे. या फ्लॅटमध्ये दिनेश रामचंद्र उर्फ रमेश चंद्र तिवारी हे कुटुंबासह राहत आहे. दिनेश तिवारी यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला २४ जुलै रोजी फिर्यादी महिला व तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यात त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. त्यानंतर सोमवारी २० रोजी त्यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तिवारीसह इतर सात जणांविरुद्ध तक्रार दिली.
याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, वरील फ्लॅट दिनेश तिवारी व त्याची पत्नी लीलाबाई तिवारी यांना घ्यायचा होता. त्याबाबत त्यांनी फिर्यादीशी संपर्क केला. या मिळकतीवर दिनेश तिवारी व त्याच्या पत्नीशी काहीही लेखी सौदा वरील मिळकतीबाबत केलेला नव्ह्ता. तसेच वकिलांसमक्ष आगर कुठल्या नोटरीसमक्ष दस्त केलेले नव्हते. फिर्यादीने त्यांच्या घरातील कागदपत्र कोणालाही दिले नाही. असे असतांना संशयित दिनेश तिवारी यांनी खोटे दस्तावेज तयार केले. साक्षीदार म्हणून प्रकाश शामलाल कटारिया व अतुल अशोक खरे यांच्या समोरही सह्या केलेल्या नाही. दिनेश तिवारी याने पूर्णतः बनावट व खोट्या स्वरूपाचा दस्त तयार केला आहे. या सौदापांवती करार नाम्यामध्ये नमूद करण्यात आलेली रक्कम ४१ लाख ५१ हजार कधी ठरलेली नव्हती. सदर सौदापावतीवर फिर्यादी महिला व तिच्या पतीचे फोटो चिटकविण्यात आले आहे. हे फोटो फेसबुक वरून घेतले असल्याची शक्यता आहे. असे फिर्यादीत म्हंटले आहे.
याप्रकरणी झंवर दाम्पत्याने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फसवूणक झाल्याची आणि खोटा गुन्हा केल्याची तक्रार दिली. पुजार झंवर यांच्या तक्रारीवरून तिवारी दाम्पत्यासह इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे















