TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे ओबीसी आरक्षण परिषद नियोजन बैठक प्रतिभाताई शिंदेंच्या अध्यक्षतेखाली उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील मोठा माळीवाडा माळी समाज मढीमध्ये ओबीसी आरक्षण परिषद नियोजन बैठक प्रतिभाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. या जिल्हास्तरीय ओबीसी आरक्षण परिषद नियोजन बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी केले.

याप्रसंगी जिल्हास्तरीय ओबीसी आरक्षण परिषद नियोजन बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकसंघर्ष मोर्चा, वर्किंग ग्रुप मेंबर, संयुक्त किसान मोर्चा दिल्लीच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे होते. या बैठकीला प्रमुख उपस्थिती करीमभाई सालार, काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील, जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष संजय महाजन, माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, रतिलाल चौधरी, हाजी हाफिजोद्दीन मोमीन व ओबीसी समाजाचे सर्व ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

सर्वप्रथम विचारमंचावरील सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. विचार मंचावरील डी.जी. पाटील, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, निलेश पवार, संजय महाजन, पुष्पाताई महाजन व ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ या सर्व मान्यवरांनी सर्व ओबीसी बांधवांना दि. २५ सप्टेंबर २०२१ रोजी “ओबीसी आरक्षण परिषद जळगाव ” येथे येण्याचे आवाहन व मार्गदर्शन केले.

या बैठकीचे प्रमुख अतिथी करीम सालार सर यांनी ओबीसी आरक्षण परिषदेविषयी सविस्तर अशी माहिती दिली व अनमोल असे मार्गदर्शन केले. या बैठकीच्या प्रमुख अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांनी देशभरात ओबीसींच्या प्रश्नावर राजकारण चांगलेच तापले आहे, महाराष्ट्रात तर ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे. आपले हक्काचे आरक्षण काढून टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायत स्तरावरचे आरक्षण यासंदर्भात विस्तृत चर्चा केली व मार्गदर्शन केले. उठ ओबीसी जागा हो !… क्रांती चा धागा हो !… असा संदेश व जयघोष करण्यात आला.

यावेळी प्रतिभाताई शिंदे यांनी धरणगाव शहरातील व ग्रामीण भागातील सर्व ओबीसींना “ओबीसी आरक्षण परिषद जळगाव ” व “खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषद चाळीसगाव” या दोन्ही ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या सर्व ओबीसी समाजबांधवांच्या नियोजन बैठकीत पी.डी.पाटील यांनी ओबीसी परिषद जळगाव व खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषद, चाळीसगाव यासंदर्भात सर्वांना माहिती दिली. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरु केलेली सत्यशोधक समाजाची स्थापना व सत्यशोधक समाज ही काळाची गरज यासंदर्भात चर्चा करून सर्व मान्यवरांना दि.२६ सप्टेंबर रोजी चाळीसगाव येथील ऐतिहासीक खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

या ओबीसी आरक्षण परिषद जळगाव नियोजन बैठकीला धरणगाव शहरातील व ग्रामीण भागातील सर्व ज्येष्ठ – श्रेष्ठ मान्यवर, सर्व समाजाचे अध्यक्ष व पदाधिकारी, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी.पाटील तर आभार माळी समाजाचे सचिव गोपाल माळी यांनी मानले. या ओबीसी आरक्षण परिषदेच्या बैठकीच्या यशस्वीतेसाठी धरणगाव शहरातील सर्व ओबीसी बांधवांनी परीश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

दिशादर्शक फलक चुकीच्या ठिकाणी लावल्याने प्रवाशांना मनस्ताप ; चंदन पाटील यांचा आंदोलनाचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पत्राचाळ प्रकरण : संजय राऊतांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी !

August 4, 2022

माझे लग्न आहे, तुमची अंगठी सोनाराला दाखवून आणतो म्हणत एकाला गंडवले !

April 22, 2022

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अमृत महोत्सव उत्साहात

August 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group