TheClearNews.Com
Sunday, June 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संबित पात्रांचे ‘ते’ ट्वीट ‘मॅनिप्युलेटिव्ह मीडिया’ श्रेणीत !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 22, 2021
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कोरोना महासाथ संदर्भात देशात संभ्रम पसरवणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न ‘कोविड-१९ टुलकिट’च्या माध्यमातून काँग्रेस करत असल्याचा आरोप केला होता, संबित पात्रांचा हा आरोप ट्विटरने फेटाळला आहे. पात्रा यांचे कथित ट्विट ‘मॅनिप्युलेटिव्ह मीडिया’ श्रेणीत आपण समाविष्ट करत असल्याचे ट्विटरने स्पष्ट केले असून ट्विटरची ही भूमिका भाजपच्या आयटीसेलला एक चपराक समजली जात आहे.

खोट्या बातम्या पसरवणे व बनावट तथ्ये उभी करून देशात ध्रुवीकरण करण्याचा व देशातल्या काँग्रेससह विरोधीपक्षांच्या विरोधात बदनामीची मोहीम चालवण्याचे आरोप या पूर्वी भाजपच्या आयटीसेलवर झाले आहेत. पण ट्विटरने आजपर्यंत एवढी कडक भूमिका घेतलेली दिसून आलेली नव्हती. आता संबित पात्रा यांनी काँग्रेसचे म्हणून दावा केलेले टूलकिट खोटे, बनावट व तथ्यामध्ये मोडतोड करून ते ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध करणे हा जनतेमध्ये भ्रम फैलावण्याचा व अफवा पसरवण्याचा प्रयत्न असल्याचे ट्विटरचे म्हणणे आहे. पात्रा यांच्याबरोबर फेसबुकवर सक्रीय असलेल्या शेफाली वैद्य यांच्या ट्विटलाही ट्विटरने ‘मॅनिप्युलेटिव्ह मीडिया’ श्रेणीत समाविष्ट केले आहे.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

नेमके प्रकरण काय?

गेल्या मंगळवारी काँग्रेसच्या कथिट टूलकिटवरून भाजप व काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारची मोठ्या प्रमाणात बदनामी केली जात असून तो व्यापक षडयंत्राचा भाग असल्याचा दावा भाजपने केला होता. आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी भाजपच्या नेत्यांनी ज्यात संबित पात्राही होते त्यांनी काँग्रेसचे म्हणून एक बनावट टूलकिट ट्विटरवर प्रसिद्ध केले व काँग्रेसची भाजपला बदनाम करण्याची रणनीती पक्षात वरपासून खालीपर्यंत कशी कार्यान्वित केली जात आहे, असा आरोप केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी काँग्रेसने हे टूलकिट भाजपच्याच आयटीसेलने तयार केले असून भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, बी. एल. संतोष, संबित पात्रा व अन्य नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी भाजपच्या या नेत्यांविरोधात फिर्याद दाखल न केल्यास न्यायालयात दाद मागू असे काँग्रेसचे नेते व वकील अमन पवार यांनी म्हटले होते. काँग्रेसने ट्विटरलाही एक पत्र लिहून नड्डा, इराणी, पात्रा व अन्य नेत्यांची ट्विटर अकाउंट बनावट टूलकिट प्रसिद्ध केले म्हणून रद्द करावे अशी मागणी केली होती. काँग्रेसचे नेते राजीव गौडा व पक्षाच्या सोशल मीडियाचे प्रमुख रोहन गुप्ता यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात अफवा पसरवणे व बनावटगिरी करत असल्याचा आरोप करत या नेत्यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद करावे अशीही मागणीही तक्रारीत केली होती. छत्तीसगडमध्ये संबित पात्रा व भाजपचे ज्येष्ठ नेते रमणसिंह यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

संबित पात्रांचे आरोप काय होते?

या कथित टुलकिट संदर्भात भाजपचे प्रवक्ते व नेते संबित पात्रा म्हणाले होते की, कोरोनाच्या महासाथीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका करण्याची व त्यांची बदनामी करण्याची संधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोडली नाही. कोरोनाचा आढळलेला नवा प्रकार हा मोदी विषाणू असल्याचा प्रचार काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून सुरू आहे. त्यात काँग्रेस परदेशी पत्रकारांना हाताशी धरून भारताची बदनामीही करत आहेत. राहुल गांधी सकाळी उठून रोज ट्विट करतात, या ट्विटमधील माहिती या टुलकिटमधील असल्याचाही आरोप पात्रा यांनी केला होता. काँग्रेसचे अनेक नेते मोदींना पत्र लिहितात. कधी अध्यक्षा सोनिया गांधी तर कधी अन्य कोणी. हे सगळे ठरवून केले जात आहे आणि हे टुलकिटद्वारे होत असल्याचा आरोपही पात्रा यांनी केला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची घोषणा तपासावी : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलिप वैद्य यांना शरद बन्सी पत्रकारीता पुरस्कार ; धरणगावात आज मान्यवरांच्या हस्ते वितरण !

September 28, 2022

हॉटेल्ससाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या १० पेक्षा कमी – आदित्य ठाकरेंची घोषणा

September 22, 2020

जिल्ह्यात आज आढळले अवघे ४ कोरोनाबाधित !

November 26, 2021

गेल्या 24 तासांत देशात 43 हजार 733 नव्या कोरोना रुग्णांची नोंद !

July 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group