जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात तसेच बाहेर जिल्ह्यात नेत महिलेवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, दि. २ ते २७ जुलैच्या दरम्यान, इस्माईल इरफान सय्यद (वय २५) याने जबरदस्तीने ३५ वर्षीय पिडीत महिलेच्या इच्छेविरुद्ध तिचेशी शारीरिक संबंध केले व सदरची बाब कोणला सांगीतली तर जिवे मारण्याची धमकी दिली. कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे पिडीतेने घाबरून दि. १९ ऑगस्ट रोजी उशीराने फिर्याद दिली. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप निरी. गणेश आहिरे हे करत आहेत. पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी अटक केल आहे.