धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
आज गुड शेपर्ड स्कुल धरणगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेच्या प्रा. चैताली रावतोळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. आज २६ जानेवारी म्हणजेच “भारतीय प्रजासत्ताक दिन.” याप्रसंगी भारतीय संविधान व लोकशाहीचे महत्व सांगण्यासाठी सहशिक्षक लक्ष्मण पाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक वर्गाने ‘संविधानाच्या उद्देशिकेचे’ सामूहिक वाचन केले. शिक्षिका भारती तिवारी यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो…’ आणि शिक्षिका स्वाती भावे यांनी ‘ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू…’ ही देशभक्तीपर गीते आपल्या सुमधुर आवाजात सादर करून उपस्थितीतांची मने जिंकून घेतली.
याप्रसंगी शाळेच्या प्रा. चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, जेष्ठ शिक्षक संतोष सूर्यवंशी, रिबेका फिलिप, भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, स्वाती भावे, ग्रीष्मा पाटील, पूनम कासार, शिरीन खाटीक, दामिनी पगारिया, पुष्पलता भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, नाजनिन शेख, लक्ष्मण पाटील, सागर गायकवाड, अमोल सोनार हे शिक्षकवर्ग तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, अमोल देशमुख, इंद्रसिंग पावरा हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुड शेपर्ड स्कुलच्या शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप ‘वंदे मातरम’ ने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय अस्खलित हिंदीत शिक्षिका पूनम कासार यांनी केले.