जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मास्टर कॉलनी परिसरातून बेकायदेशीररीत्या गुरांची वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेत १५ गुरांची सुटका करण्यात केली. अवसानगरातील कत्तलखान्यावरही कारवाई केली असून, तेथून ४० गुरांची सुटका करण्यात आली. अश ५५ गुरांची कुसुंबा गोशाळेत रवानगी करण्यात आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमएच १९ सीवाय २३३०, एमएच ४७ ई ३०९४ आणि एमएच १९ सीवाय ३२२९ या क्रमांकाच्या वाहनात गुरांना कोंबून मास्टर कॉलनी परिसरातील वाहतूक केली. जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यात शेख राजीक शेख रफिक (२९), शेख रेहान शेख युसूफ कुरेशी ( वरणगाव), अदनान कल्यूम खान (दत्तनगर, मेहरुण), इफ्तेखार शरीफ खान (मास्टर कॉलनी), सरफराज रहिम शेख (मास्टर कॉलनी), सय्यद वाजीद सय्यद इब्राहिम (रथ चौक, जुने जळगाव), सय्यद अनीस सय्यद हमीद मन्यार (मन्यार मोहल्ला, मेहरूण) यांना अटक करण्यात आली. कत्तलखान्यावर कारवाई करत असरार शेख मुक्तार शेख यास अटक केली आहे.
वाहतूक करत असताना १५ गुरांची सुटका केल्यानंतर अक्सानगर भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये चोरी करून आणलेले ४० गुरे कत्तलीसाठी आणून ठेवल्याचे आढळून आले. या ठिकाणी पोलिसांनी ४० गुरांची सुटका केली. दोन्ही कारवाईत एकूण ५५ गुरांची सुटका करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, दत्तात्रय पोटे, अतुल वंजारी, प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, राजेंद्र कांडेलकर, दीपक चौधरी, सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सय्यद, किशोर पाटील, किरण पाटील, मंदार पाटील, चेतन पाटील, आशा पांचाळ यांनी केली. तपास दत्तात्रय पोटे करीत आहेत. दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या ५५ गुरांना कुसुंबा येथील आर. सी. बाफना गोसेवा अनुसंधान गोशाळा येथे ठेवण्यात आले आहे.